सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (16:53 IST)

पेट्रोल डीझेल पाच रुपयांनी स्वस्त कमी झाल्या किंमती

पेट्रोल डीझेलच्या किंमती कमी झाल्या यावर विश्वास बसने अवघड आहे, मात्र खर असून इंधनाच्या किंमती सरकारने कमी केल्या आहे. पेट्रोल-डिझेलची प्रचंड दरवाढ, महागाई यामुळे जनता वैतागली असून सरकारवर प्रचंड नाराज आहे.

हे पाहता केंद्रातील मोदी सरकारने दरवाढ कमी करण्यासाठी आज मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून इंधनाचे 2.50 रुपये कमी करण्यात आला आहे. हे होताच देवेद्र फडणवीस यांनी सुद्धा  2.50 रुपये कमी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली असून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर आता 5 रुपयांनी कमी होणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला थोडा दिलासा मिळणार आहे.