रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (09:36 IST)

पुन्हा एकदा इंधन दर वाढ

इंधन दरात गुरुवारी पुन्हा वाढ झाली असून पेट्रोल लीटरमागे १५ पैशांनी तर डिझेल २० पैशांनी महागले आहे. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे नागरिकांची एक दिवस दरवाढीतून सुटका झाली होती. 
 
दिल्लीत पेट्रोल दर ८४ रूपये प्रति लीटर तर डिझेल ७५.४५ पैसे प्रति लीटर आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल ९१.३४ पैसे (प्रति लीटर वाढ ०.१४ पैसे वाढ) तर डिझेलचा दर ८०.१० पैसे (०.२१ पैसे वाढ) आहे.
 
दरम्यान, पेट्रोलियम उत्पादनांचा अजून जीएसटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्हॅट आणि अन्य स्थानिक करांनुसार प्रत्येक राज्यात पेट्रोलचे दर बदलत जातात. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दररोज कच्चा तेलाचे दर वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.