बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (08:39 IST)

१९ गोष्टींवर सीमा शुल्क वाढला टीव्ही फ्रिजच्या किंमती वाढल्या

देशात पेट्रोल दरवाढ होत असून त्यामुळे जनतेत मोठा रोष निर्माण झाला आहे. त्यात भर म्हणून केंद्र सरकारने टीव्ही, फ्रिजसह 19 ऐशोरामाच्या वस्तूंवरील सीमा शुल्कात वाढ केली आहे. यामुळे परदेशातून भारतात आयात होणाऱ्या या वस्तू आणखी महाग होणार आहेत. त्यामुळे जे दिवाळी नवीन वस्तू घेणार त्यांना ती महाग मिळणार आहे.जगात भारतीय रुपया कमालीचा घसरला असून, यामुळे चालू खात्यामधील तोट्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार काही गरजेच्या नसलेल्या वस्तूंवर सीमा शुल्क वाढवून त्यांची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यानुसार केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. आज मध्यरात्रीपासून हे शुल्क लागू होणार आहे. हा मोठा निर्णय बुधवारी रात्री लागू होणार आहे.  या 19 वस्तूंवसाठी जादा शुल्क मोजावे लागणार आहे. गरजेच्या नसलेल्या वस्तूंची मागणी कमी होईल आणि मेक इन इंडियाला प्राधान्य मिळेल असा सरकारचा कयास आहे.
 
या निर्णयाचा तोटा प्रामुख्याने चीनला होणार असून, चीनमधून सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात आयात होतात. आर्थिक वर्षात 2017-18 मध्ये जवळपास 86 हजार कोटी रुपयांच्या वस्तू भारतात आयात करण्यात आल्या होत्या.