शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (11:54 IST)

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी 259 जागांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ

govt jobs
Talathi Bharti 2023 : भूमी अभिलेख विभागामार्फत होणाऱ्याधुळे व नंदुरबार जिल्ह्यातील  तलाठी वर्ग क  संवर्गातील सरळसेवा भरतीसाठी 259 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरु केले असून अपेक्षेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे तलाठी भरती साठी उमेदवारांना अर्ज व परीक्षाशुल्क भरण्याची शेवटची तारीख 17 जुलै होती ती आता 18 जुलै करण्यात आली आहे. 

सध्या राज्यात तब्बल चार हजार पदे रिक्त आहे. गाव पातळीवर काम करण्यास अडचण येत आहे. हे लक्षात घेत राज्य शासनाने रिक्त तलाठी पद भरण्याचा निर्णय घेतला आहे. तलाठी भरती परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्जदारांना 18 जुलै 2023 पर्यंत अर्ज करायचे आहे. पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवीचे शिक्षण घेतलेले असावे. 
उमेदवारांना https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. 
 
 Edited by - Priya Dixit