शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 30 जून 2022 (11:33 IST)

भाजपाबरोबर चर्चा लवकरच: एकनाथ शिंदे (Live Updates)

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापनेची कसरत अधिक तीव्र केली आहे. भाजप आणि शिंदे गटाचे नेते राज्यात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित करणार आहेत. महाराष्ट्राशी संबंधित प्रत्येक माहिती...
 
उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत म्हणाले - बाळासाहेबांचा वारसा आम्ही पुढे नेऊ. आम्हाला सत्तेचा लोभ नाही. सरकार पाडण्यामागचे कारण कोणास ठाऊक? एकनाथ शिंदे भाजपसोबत जाण्यासाठी शुभेच्छा.
 
-देवेंद्र फडणवीस यांचा राज्याभिषेक निश्चित. आज राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करता येईल.
सकाळी 11 वाजता भाजपची मोठी सभा.
लवकरच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची बैठक घेणार आहेत.
-आज शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यातून दिल्लीत परतू शकतात.

11:31 AM, 30th Jun
"आता आपले मार्ग वेगळे झाले आहेत, दोष देण्यात अर्थ नाही, बंडखोरांना पश्चाताप होईल," असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे लवकरच भाजपा आणि आपली चर्चा होईल असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.
 
भाजपा आणि आपली अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. मंत्रिपदाच्या याद्या वगैरे यांच्या बातम्या खोट्या आहेत असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
 
'वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस', असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
 

11:09 AM, 30th Jun
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर आगपाखड केली आहे.
 
"शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी मी प्रयत्न केले, तुम्ही करणार का," असा प्रश्न त्यांनी शिंदे गटाला विचारला आहे.
 
"अडीच वर्षांपूर्वी आमचं म्हणणं ऐकलं असतं, चर्चा झाली असती, तर पुढचा प्रयोग झाला नसता," असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
 
"आता आपले मार्ग वेगळे झाले आहेत, दोष देण्यात अर्थ नाही, बंडखोरांना पश्चाताप होईल," असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे लवकरच भाजपा आणि आपली चर्चा होईल असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.