गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 8 जानेवारी 2023 (12:18 IST)

धुळ्यात टँकरची अनेक वाहनांना धडक, चालकाला अटक

धुळ्यात रात्री एका मद्यपी टँकर चालकाने शहरातील अनेक वाहनांना धडक दिल्याने अपघात घडला.फाशीपूल ते संतोषी माता चौका जवळ हा अपघात घडला असून अपघातात अनेक वाहन चालक जखमी झाले असून गाड्यांचे देखील नुकसान झाले आहेत.टँकर चालक राजेंद्रसिंग सकट असे या मद्यपी चालकाला अटक केली आहे. 

सदर टँकर चालक टँकर घेऊन गुजरात कडे जात असताना धुळे शहरातील फाशी पूल ते संतोषी माता चौकात त्याने अनेक वाहनांना धडक दिली. या वेळी त्याने मद्यपान केले असून तो नशेत होता. त्याने मदधुंद अवस्थेत टँकरने अनेक वाहनांना धडक दिली आणि वाहन चालकांना जखमी केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी मद्यपी टँकर चालकाला अटक केली आहे. 
 
Edited By - Priya Dixit