सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (16:07 IST)

लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून तरुण तेजपाल निर्दोष

तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून आता निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यांच्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर गोवा सत्र न्यायालयात खटला सुरु होता.
 
तरुण तेजपाल हे तेहलका मॅगझिनचे मुख्य संपादक होते. २०१३ मध्ये ते एका मोठ्या हॉटेलमध्ये लिफ्टमधून जात असताना त्यांनी आपल्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केले असा आरोप त्यांच्यावर होता. गोवा पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी तेजपाल यांच्यावर नोव्हेंबर २०१३ मध्ये गुन्हा दाखल केला होता, त्या वेळी त्यांना अटक करण्यात आली. मे २०१४ पासून त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. गोव्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र निश्चिात करण्यास स्थगिती मागितली होती. पण ती याचिका फेटाळण्यात आली होती
.
यापूर्वी या प्रकरणाचा निकाल २७ एप्रिलला लागणार असं जाहीर कऱण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर या निकालाला १९ मे पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजी दोन ते तीन दिवसांपासून लाईट नसल्याने न्यायाधीशांना या प्रकरणाचा अभ्यास करता आला नाही आणि त्यामुळे त्यांना अधिक वेळ हवा असल्याने निकालाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचं तेजपाल यांचे वकील सुहास वेलिप यांनी सांगितलं.