शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मार्च 2017 (15:04 IST)

पदमश्री डॉ. तात्याराव लहाणे नेत्ररोग शस्त्रक्रियांसाठी नाशिक येथे पुन्हा दाखल

दि. 1 जानेवारी 2017 रोजी नाशिक येथे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी आयोजित केलेल्या विनामुल्य् महाआरोग्य् शिबिरात तपासलेल्या  6239  रुगणांपैकी 956 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. प्रथम  टप्प्यात शस्त्रक्रियेपुर्वीच्या अत्यावश्य्क चाचण्यामधून  निवड झालेल्या  रुग्णांवर दि. 7 ते 8 फेब्रुवारी 2017 या कालावधीत नाशिक जिल्हयातील व  शहरातील महिला व पुरुष अशा एकूण 467 मोतीबिंदुच्या रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. या रुग्णांमध्ये 11 वर्ष ते 105 वर्ष या वयोगटातील रुग्णांचा समावेश होता. या यशस्वी  शिबिरानंतर ग्रामीण भागातील तसेच नाशिकच्या काही शहरी भागातील उर्वरित  रुग्णांसाठी

*दि.02 मार्च ते 04 मार्च 2017* या कालावधीत मोतीबिंद तपासनी  व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य् रुग्णालय, नाशिक येथे  करण्यात आले आहे.
 
सदर शस्त्रक्रिया शिबिरासाठी मुंबई येथील सर ज. जी. समुह रुग्णालये  (जे.जे.हॉस्पीटल ) व ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदमश्री डॉ. तात्याराव लहाणे, नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ.रागिणी  पारेख व अनुभवी तज्ञांसोबत जिल्हा सामान्य् रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे तज्ञ उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात दुर्बिनीद्वारे अत्याधुनिक पध्दतीने मोफत दर्जेदार लेन्सचे प्रत्यारोपन करुन मोफत चष्म्याचे वाटप देखील करण्यात येणार आहे.  मागील शिबिरातील लाभार्थ्यांनी मा.पालकमंत्री व प्रशासनाचे आभार मानले आहेत.  तरी नाशिक जिल्हयातील जनतेने सदर शस्त्रकिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री संपर्क कार्यालय, नाशिक यांचेमार्फत करण्यात येत आहे.