मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 नोव्हेंबर 2023 (12:31 IST)

कोल्हापुरात भीषण अपघात, नदीच्या पुलावरून बस कोसळली

Terrible accident in Kolhapur
कोल्हापूर- गोव्याहून मुंबईकडे कऱ्हाडमार्गे जात असलेल्या एका खाजगी बसचा पुलावरून कोसळून अपघात झाल्याची बातमी आहे. गुरुवार सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 
 
कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात असलेल्या वारणा नदीवरील कोकरूड कोणावर घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र बसचे किरकोळ नुकसान झाले आहे.
 
काल येथे पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने तसेच आज परिसरात मोठ्या प्रमाणात धुके असल्याने समोरचे काही स्पष्ट दिसत नसल्यामुळे सकाळी 8 वाजता ही बस प्रवाशांना घेऊन या पुलावरून जात असताना अचानक चालकाचा बस वरील ताबा सुटला. बस थेट वारणा नदीच्या पात्रात कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
सुदैवाने नदीला पाणी कमी होते आणि बस नदीपत्रात कोरड्या भागात जाऊन थांबली. तेव्हा बसमधील प्रवासी त्वरित बाहेर पडले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून किरकोळ जखमींना उपचारासाठी आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे.