शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (15:33 IST)

मला तुरुंगात टाकण्याचा होता ठाकरे सरकारचा प्लॅन ; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

fadnavis uddhav
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांनंतर आता उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले की, "ठाकरे सरकारने मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिले होते." असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री पद मला मिळणार नाही, हे आधीपासूनच ठरलं होतं. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याची कल्पना माझीच होती." असे देखील त्यांनी सांगितले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. आजही माझे त्यांच्याशी कोणतेही वैर किंवा कटुता नाही. पाच वर्ष ज्यांच्यासोबत मी काम केले, त्यांनी माझा साधा एकही फोन उचलला नाही. याउलट गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीची सत्ता असताना माझ्यावर वेगवेगळे खटले कसे दाखल करता येतील? यासाठी प्रयत्न करण्यात आले. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला अडकवण्याचा टार्गेटच तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले होते.", अशी टीका त्यांनी यावेळी केली.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor