बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 (11:07 IST)

ठाण्यात अॅसिडने भरलेला ट्रक पलटला

ठाणे- व्यस्त घोडबंदर रोडवर आज सकाळी अॅसिड भरलेला एक कंटेनर ट्रकने पलटी मारली आणि क्षेत्रात अॅसिडचा धूर भरून गेला. ज्यामुळे अधिकार्‍यांनी जवळची शाळा रिकामी करवली.

ठाणे महापालिका, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन सेलचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की अनेक ड्रम हायड्रोक्लोरिक अॅसिडने भरलेला ट्रक सकाळी आठ वाजा गैमुख चौकीजवळ पालटून गेला. परिणामस्वरूप त्यातून अॅसिड बाहेर पडू लागलं.
 
त्यांनी सांगितले की पूर्ण क्षेत्रात अॅसिडचा धूर पसरल्यामुळे घटनास्थळाचा जवळ असलेली शाळा आणि चुंगी चौक बंद करण्यात आले आणि शाळेकरी विद्यार्थ्यांना व कर्मचार्‍यांना घरी पाठवले गेले. घटनेत ट्रक ड्राइवर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात हालविण्यात आले.
 
कदम यांनी सांगितले की रस्त्यावरून ट्रक हटवण्याचे काम सुरू आहे.