शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 जुलै 2022 (20:49 IST)

विठ्ठल नामाचा जयघोष: वाखरीत तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा रंगला

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाखरी पालखी तळ येथे संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्यात रिंगण सोहळा पार पडला. पावसाळी ढगाळ वातावरणात रिंगण सोहळा पाहण्यास वारकरी बांधव आतुर होते. विठ्ठलाच्या नामाच्या जयघोषात रिंगण सोहळा पार पडला. पालखी सोहळ्यात रिंगणास महत्व आहे. हा एक महत्वाचा टप्पा असतो. रिंगण सोहळ्याचे तारीख व जागा ठरलेली असते. त्यामुळे तेथे गर्दी होतोच. रिंगण म्हणजे सोहळ्यातील एक उत्सव, यावेळी भक्ती अपार होते. अश्व धावत असताना ते डोळ्यात साठवण करण्यासाठी वारकरी व भक्त गर्दी करतात. पालखीस रिंगण घातला जातो
 
यंदा नव्याने चार पदरी राष्ट्रीय महामार्ग केल्याने ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुलाच्या बाजूने तर संत तुकाराम महारांजाची पालखी पुलावरुन आली. पुल संपतातच तिथे उभा रिंगण सोहळा पार पाडला. संत तुकाराम महाराज पालखी पिराची कुरोली येथील पालखी तळ जागेत होती. तिथून दुपारी 12 वाजता पालखीने  पंढरपूरकडे प्रस्थान केले. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच पासून, पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या जोरात वारकरी बांधवानी हरिनामाचा गजर करत, विठ्ठल नामाचा जयघोष करत, मुखी तुकाराम.. तुकाराम म्हणत पावसात पंढरीचा ओढ कायम ठेवत पंढरपुराच्या दिशेने चालणे चालूच ठेवले.
 
वाखरी येथील बाजीराव विहिरीच्या पुढे आल्यावर संत तुकाराम महाराज पालखी पुलावर थांबली. सुमारे 500 मीटर अंतराचे उभा रिंगण झाला. सोहळ्यातील दोन्ही अश्व धावले. त्यापूर्वी तेथील वातावरण विठ्ठलमय झाले. पावसाच्या सरी सुरू असताना विठ्ठलाच्या भक्तीचा गजर सुरू होता. चोपदारांनी आदेश देताच वारकऱ्यांनी दोन रांगा केल्या आणि त्या रांगेतून दोन्ही अश्व धावले.
 
वाखरी येथे उभा रिंगण सोहळा पार पाडल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीने वाखरी येथील पालखी स्थळाकडे प्रस्थान केले. रात्री तिथे मुक्काम करत .शनिवारी सकाळी वाखरी येथे दर्शनासाठी पालखी निघाली. दुपारी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.