बुधवार, 10 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (09:53 IST)

विलासराव देशमुख फाऊंडेशनचे उत्तम काम जगवली जवळपास दोन हजार झाडे

The best work of Vilasrao Deshmukh Foundation has been successful
लातूर जिल्हा हा आता दुष्काळग्रस्त आणि सतत पाण्याची कमतरता असा जिल्हा म्हणून देशात ओळखला जातोय. मात्र ही ओळख पुसण्यासाठी अनेक व्यक्ती व सामाजिक संस्था काम करतात. असेच एक काम विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून केले आहे. लौत्र  शहरातील विलासराव देशमुख मार्ग (जुने रेल्वे लाईन) हरीत करण्याचा निर्णय या संस्थेने घेतला.  या मार्गावर १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाच किलो मीटर म्हणजेच राजस्थान विद्यालय ते लातूर-बार्शी रोडवरील रेल्वे उड्डाण पुलापर्यंत दुतर्फा २०६७ सहा फुटांची निल गुलमोहराची झाडे लावण्यात आली़, दोन झाडांमध्ये चार मीटर अंतर ठेवण्यात आले़, या झाडांना दर १५ दिवसांला प्रति झाड ६० लिटर पाणी टॅकरद्वारे दिले जाते. आज १८२२ झाडे जगली़ असून सर्व झाडे १२ फुटाची झाली  आहेत. 
 
जंगलांचे प्रमाण कमी होत चालले आहे. याला आपण आळा घातला पाहिजे. वृक्षारोपण केले पाहिजे. आपणही वैयक्तिक स्तरावर दर वर्षी एक झाड लावलं तर लातूरचे रूपडे बदलून जाईल. असे आवाहन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्याचे वनक्षेत्र ०.४ टक्क्याच्या जवळपास आहे ही बाब चिंताजनक आहे़. त्यामुळेच लातूरमध्ये वनक्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न आमदार अमित देशमुख यांच्या माध्यमातून होतो आहे़. वन विभागाच्या लातूर परिक्षेत्रात लातूर, औसा, रेणापूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. या तीन तालुक्यात एक लाख २० हजार वृक्षांची लागवड करण्याचा शासकीय कार्यक्रम असला तरी आमदार देशमुख यांनी वृक्षलागवडीत पुढाकार घेतला असल्यामुळे येत्या काही वर्षांत वृक्षलागवड व संगोपनात लातूर शहर क्रमांक एकवर राहिल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.