1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (16:58 IST)

विद्यार्थ्यांचे ओझे कमी होणार, मोफत वह्या मिळणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Deepak Vasant Kesarkar
आता इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं ओझं कमी करवून त्यांना मोफत वह्यांचे वाटप करून गृहपाठ बंद करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दफ्तारचे ओझे जास्त असून त्यांचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांचा समावेश असलेल्या वह्यांचे मोफत वाटप केले जाणार असून या वहीतच पाठ्यक्रम असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याची माहिती दिली होती त्यानुसार आता राज्य सरकार इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी पाऊले उचलण्याची माहिती दिली आहे. सध्या विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांची पुस्तके आणि वह्या मुळे दप्तराचे ओझे वाढतात. त्यामुळे त्यांना शारीरिक अस्वस्थता जाणवते तसेच त्यांच्या मनावर देखील या ओझ्याचे दडपण येते. आता राज्यसरकार ने त्यांचे ओझे कमी करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांच्या स्वतंत्र पुस्तकांऐवजी आता पुस्तके वह्यांमध्ये देण्याचा विचार केला असून आता विद्यार्थ्यांना शाळेत येताना एकच वही आणावी लागणार असून त्यांचे पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी होणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली 
 Edited By - Priya Dixit