शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (15:08 IST)

कोणाला संधी मिळणार? राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार

५ ऑगस्टला राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवारी मंत्रीमंडळ विस्तार होईल असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी फक्त ज्येष्ठ आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे सात आणि शिंदे गटातील सात आमदारांचा समावेश आहे.
 
३० जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला होता. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी आशा होता. यासाठी एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दौरेही सुरु होते. पण महिना उलटल्यानंतरही मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने विरोधकांकडून सतत टीका होत आहे.
 
भाजपामधून कोणाला संधी मिळणार?
१) चंद्रकांत पाटील
२) सुधीर मुनगंटीवार
३) गिरीश महाजन
४) प्रवीण दरेकर
५) राधाकृष्ण विखे पाटील
६) गणेश नाईक
७) रवींद्र चव्हाण
 
भाजपा गटातील संभाव्य मंत्री कोण?
१) दादा भुसे
२) उदय सामंत
३) गुलाबराव पाटील
४) शंभूराज देसाई
५) संदीर भुमरे
६) संजय शिरसाट
७) अब्दुल सत्तार
 
अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे.