वासराचे बारसे धुमधडाक्यात केले
आपण मुलांचे बारसे धुमधडाक्यात करणे हे ऐकतोच.पण आपल्या सोबत राहणाऱ्या प्राण्याचे बारसे करणे ऐकणे हे नवलच आहे. असेच काहीसे घडले आहे. देगलूर तालुक्यातील खानापूर येथे. या ठिकाणी मारुती मारजेवाडे या शेतकऱ्याच्या शेतात दोनवर्षापूर्वी त्यांना मरणासन्न अवस्थेत एक गाय आढळून आली. त्यांना त्या गायीची द्या आली आणि त्यांनी त्या गायीला आपल्या घरी आणले आणि तिचे औषधोपचार करून तिची सुश्रुषा केली. आणि आपल्या कुटुंबियांच्या सदस्यांप्रमाणे तिचा सांभाळ केला. औषोधोपचार केल्याने ती गाय बरी झाली आणि तिने एका गोंडस वासराला जन्म दिले. मारजेवाडे यांना मुलबाळ नाही, त्यामुळे या कुटुंबीयांनी या वासऱ्याचे आपल्या लेकरा प्रमाणेच थाटामाटात बारसे केले. या कुटुंबियांच्या या सोहळ्याचे या परिसरात कौतुक होत आहे. या सोहळ्यात त्यांनी पाहुण्यांना आमंत्रण देऊन गोडाचे जेवण दिले. आणि बायकांनी पाळणा म्हटला.