शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (22:18 IST)

मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली

महाविकास आघाडी सरकारचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांच्या लवकर निर्णय घेतो असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते राज्यपाल सकारात्मक असून लवकर निर्णय घेतील अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राज्यपालांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि अतिवृष्टीच्याबाबतीत माहिती जाणून घेतली असल्याचेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यापलांना १२ आमदारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विनंती केली असल्याचे सांगितले आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि राज्यपालांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली आहे. या चर्चेची माहिती अजित पवार यांनी देताना म्हटलं आहे की, राज्य सरकारने ठराव करुन १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. या यादीला अनेक दिवस झाले त्यावर कार्यवाही झाली नसल्यामुळे राज्यपालांना विनंती केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदाराच्या नियुक्तीचा अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत लवकर निर्णय घेतो असे म्हटलं असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.