मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (12:29 IST)

मुख्यमंत्री बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार

पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी (21ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिली. 
 
उद्धव ठाकरे हे 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सोलापूर विमानतळावर येतील. त्यानंतर सकाळी 10.15 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव व अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील आणि त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते सोलापूरच्या दिशेने रवाना होतील.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी 20 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हा पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा दिवसभर होती. मात्र हा दौरा बुधवारी 21 ऑक्टोबर रोजी आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे सोमवारी सोलापूर व बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा असल्याची माहिती दिली आहे.