मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (07:46 IST)

मुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर जाणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी एका दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सांगवी, अक्कलकोट येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री दौरा करणार आहेत.
 
मुख्यमंत्री सांगवी खूर्द येथे नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर अक्कलकोट शहर हत्ती तलावाची पाहणी, उमरेगेमधील आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी करुन मुख्यमंत्री अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.