शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (07:55 IST)

या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही : शरद पवार

शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधासनभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा मध्यावधी निवडणुकीचा दावा फेटाळून लावला. राज्यात मध्यावधीची शक्यता नाही असं ते म्हणाले आहेत. ते पंढरपुरात बोलत होते. 
 
शरद पवार यांनी भेटीवर बोलताना सांगितलं की, “संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही. संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळीच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती घेणार असं जाहीर केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही.
 
दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असा दावा केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली,” असल्याचं म्हटलं. यावर बोलताना शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे खंडन केलं आहे.