गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (09:00 IST)

थंडीचा जोर वाढला, विदर्भात थंडीची लाट

राज्यात आता थंडीचा जोर वाढू लागला असून विदर्भात थंडीची लाट असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सलग ५ दिवस सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे नोंदविले जात आहे. चंद्रपूर येथे किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत तब्बल ८.८ अंश सेल्सिअसने कमी आहे. विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
 
चंद्रपूर येथे गुरुवारी १२.४ अंश, शनिवारी ११.७ अंश, रविवारी १० अंश आणि सोमवारी ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.