बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मार्च 2020 (10:55 IST)

कोरोना विरुद्धचा लढा अधिक तीव्र, राज्यात संचारबंदी लागू

महाराष्ट्र करोनामुळे बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातली सगळी प्रार्थनास्थळंही बंद करण्यात आली आहेत. फक्त पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. करोनाचा धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. शिर्डी, औरंगाबाद येथील विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. 
 
काय काय सुरु राहणार?
 
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
शेती निगडीत औषधांची दुकानं सुरु राहणार
किराणाची दुकानं
मेडिकल्स
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दवाखाने, रुग्णालयं