शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 डिसेंबर 2018 (17:06 IST)

राज्यात थंडीचा कडाका कायम

राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांश भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, तर कोकणात लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्रातील थंडीची लाट तीव्र बनली असून, नगर 4.5, पुणे 6, नाशिक 7 अंश सेल्सिअस अशी किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, नागपुरात थंडीने गारठून दोघांचा मृत्यू झाला.
 
उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने येणार्‍या थंड वार्‍यांचा प्रभाव वाढला आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमी दाबाची क्षेत्रे किंवा द्रोणीय स्थिती सध्या अस्तित्वात नाही.राज्यातील वातावरण निरभ्र असून, या सर्व स्थितीमुळे कोकण, मुंबईसह संपूर्ण राज्य थंडीने गारठल्याचे दिसते. दरम्यान, राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद विदर्भातील नागपूर येथे 4 अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. तर गोंदिया 5.2, वर्धा 7.5, अकोला 5.9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. येत्या 48 तासांत विदर्भात थंडीची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.