गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 डिसेंबर 2018 (11:11 IST)

आझाद यांना डांबून ठेवणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळपेची असल्याची टीका - जितेंद्र आव्हाड

भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची मुंबईत सभा रद्द झाली असून, सोबतच पोलिसांनी पुण्यालाही जाऊ देणार नाही हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखऱ आझाद यांना डांबून ठेवणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळपेची असल्याची टीका केली असून,  आव्हाड यांनी चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या हॉटेल मनालीमध्ये जाऊन त्याची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
मला वाटतं सरकारने त्याला डांबून ठेवून चूक केलीय, चैत्यभूमीला जाण्यापासून रोखणं हे चुकीचं असून, सरकार अशाप्रकारे विरोधकांचा आवाज दाबू शकणार  नाही. त्यामुळे आता सरकारला यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. लोकशाहीची हत्या, विटंबना आहे. त्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असून ही त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे असे आव्हाड यांनी म्हंटले आहे. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्रशेखर आझाद यांची २९ डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी ४ वाजता सभा होणार होती. वरळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती.