लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
माझी लाडकी बहीण योजनेचे फायदे कोणत्याही व्यत्ययाशिवाय मिळविण्यासाठी, ई-केवायसी अनिवार्य आहे. मुख्यमंत्र्यांची "माझी लाडकी बहीण"योजना महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत राबविली जाते. या योजनेअंतर्गत, सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना मासिक ₹1500 ची आर्थिक मदत मिळते.
राज्यात एकूण 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकाच्या तयारीला लागले आहे. राज्य सरकारने माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिलासा दिले आहे.
लाडकी बहीण योजनेचे फायदे योग्य आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचावेत यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक लाभार्थी महिलांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने ई-केवायसीसाठीची मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. या योजनेत काही ठिकाणी बोगस लाभार्थी घुसल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी बंधनकारक केले आहे. या प्रक्रियेद्वारे पात्र महिलांची पडताळणी केली जाणार असून, ज्या महिलांचे ई-केवायसी अपूर्ण असेल, त्यांचा लाभ रोखला जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात, "माझी लाडकी बहीण" योजनेच्या महिला लाभार्थ्यांना 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी त्यांचा ऑक्टोबरचा हप्ता ₹1,500 देण्यात आला. नोव्हेंबरचा हप्ता अद्याप मिळालेला नाही आणि डिसेंबर महिना संपत आला आहे. परिणामी, महिला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यस्त आहेत, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यांची वाट पाहत आहेत.
Edited By - Priya Dixit