मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2024 (11:24 IST)

मुंबई कोर्टाचा निर्णय आरोपीला 20 वर्षाचा तुरुंगवास, 8 वर्षाच्या मुलासोबत केले दुष्कर्म

court
मुंबई- मुंबई कोर्टाने 26 वर्षाच्या आरोपीला 20 वर्षाचा तुरुंगवास ही शिक्षा दिली आहे. या आरोपीने 8 वर्षाच्या मुलासोबत दुष्कर्म केले. सर्व पुरावे पडताळून मुंबई कोर्टाने या आरोपीला दोषी मनात 20 वर्षाचा कारावास दिला आहे. 
 
कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेमुळे पीडित मुलाच्या मनावर खूप मोठा आघात झाला आहे. ज्याचा परिणाम खूप वेळ पर्यंत राहणार आहे. लहान मुलांच्या मनावर लवकर परिणाम होतो. तसेच   अश्या वाईट गोष्टींमुळे लहान मुलांना खूप काही झेलावे लागते. या 8 वर्षाच्या मुलासोबत घडलेल्या या कृत्यामुळे त्याला कदाचित चांगले जीवन जगतांना खूप त्रास होईल.  
 
8 वर्षाच्या या लहान मुलाचे शारीरिक शोषण हा आरोपी करीत होता. या घटनेमुळे पीडित मुलाच्या शरीरावर, मनावर खूप मोठा आघात झाला आहे. कदाचित ही जखम भरून यायला वेळ देखील लागेल.  ह्या सर्व बाबी लक्षात घेता मुंबई कोर्टाने या 26 वर्षीय आरोपीला 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. 

Edited By- Dhanashri Naik