1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (15:59 IST)

बाप्परे, फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथे वृंदावन दर्शन या अपार्टमेंट मधील एका फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मागील 4 महिन्यांपूर्वी उमरोळी येथील अमिता मोहिते ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्यास घरातून निघून गेली होती. 
 
या 4 महिन्यांमध्ये तरुणीचा प्रियकर तीच सोशल मीडिया वापरत असून व्हाट्सएप द्वारे तो तरुणीच्या घरच्यांशी त्यांची मुलगीच असल्याचं भासवून संपर्कात होता. मात्र तरुणीच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तपासात या तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांना प्रियकराने दिली. धक्कादायक बाब म्हणजे फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेऊन या तरुणाने स्वतः भिंतीवर बांधकाम केलं. शिवाय तो यांचं फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून भाड्यावर रहात होता.