मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (15:57 IST)

एकनाथ खडसे ईडीसमोर चौकशीसाठी हजर

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. मुंबईतील कार्यालयात त्यांची भोसरी भूखंड प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स आले होते. 
 
यावेळी एकनाथ खडसे यांच्यासमवेत त्यांची कन्या शारदा खडसे-जाधव सुद्धा ईडीच्या कार्यालयात आल्या होत्या. एकनाथ खडसेंची तब्येत ठिक नसल्याने त्यांच्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, एकनाथ खडसेंची सुरु असताना ईडी कार्यालयाबाहेर प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांना बॅरिकेडस्‌ लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्य राखीव पोलिस दलाची सशस्त्र तुकडीही तैनात करण्यात आली आहे.