1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (21:38 IST)

खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार

polititician and senior leader of NCP Eknath Khadse
पुण्यात भोसरी जमीन  घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी खडसेंना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना झाल्याने क्वारंटाईन व्हावे लागले होते. आता उद्या क्वारंटाईन पिरिअड संपल्यावर उद्याच अर्थात शुक्रवारी खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. जमीन व्यवहार  या वादग्रस्त प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 मध्ये त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आतापर्यंत याच प्रकरणी चार वेळा त्यांना चौकशीला समोरे जावे लागले आहे.