गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (15:58 IST)

वर्ध्यात आठ मोर मृतावस्थेत आढळले

Eight peacocks
वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव-दातार येथील शिवारात  आठ मोर मृतावस्थेत आढळले हेत.  घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळ दाखल झाले आहेत. मृत मोरांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.
 
अहवाल आल्यावरच मोरांचा मृत्यू कशाने हे स्पष्ट होईल. नाल्याच्या बाजूला हे आठ मोर मृतावस्थेत आढळून आले आहेत. यामध्ये एक नर तर सात मादी असल्याचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या बर्ड फ्ल्यूची साथ सुरू आहे. अशात आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.