गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (15:08 IST)

मकर संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी या प्रकारे ‍दिवा लावा, निरोगी राहाल

दीपदान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात प्रकाश येतो असे म्हटलं जातं. कोणत्याही विपत्तीच्या निवारण हेतू दीपदान श्रेष्ठ उपाय आहे. तसं तर वर्षभरात कधीही दीपदान करता येतं परंतू विशेष तिथी, दिवस, मास आणि नक्षत्रावर दीपदानाचे अधिक महत्त्व आहे.
 
शास्त्रानुसार संक्रातीच्या दुसर्‍या दिवशी एक पाव तेलाचा दिवा 21 दिवस अखंड लावल्याने प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळते.
 
-75 वाती असलेला दिवा लावल्याने शत्रुंचा नाश होतो.
 
राजभय असल्यास संक्रातीच्या संध्याकाळापासून सव्वा पाव तेलाचा दिवा 40 दिवस प्रजवल्लित केल्याने भीती दूर होते.
 
संतान प्राप्तीसाठी संक्रातीपासून 19 दिवस सव्वा पाव तेलाचा दिवा प्रजवल्लित करावा.
 
ग्रह पीडा निवारण हेतु दीपदान केल्याने मदत होते.
 
गंभीर आजारापासून मुक्तीसाठी तेलाचा अखंड दिवा संक्रातीपासून 20 दिवस लावल्याने आरोग्य लाभ प्राप्ती होते.