थंडीत लहानग्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या...

Last Modified गुरूवार, 14 जानेवारी 2021 (15:16 IST)
थंडीत लहानग्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः एक वर्षाच्या आतील मुलांना थंडीचा त्रास होण्याची शक्यता असते. थंडीमुळे त्यांच्या त्वचेवर आणि आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. थंडीचा कडाका त्यांना आजारी पाडू शकतो. गारठ्यामुळे हसतं-खेळतं मूल अचानक मलूल होतं. म्हणूनच बदलत्या वातावरणाचा कमीत कमी परिणाम होईल आणि त्यांना कमीत कमी त्रास सोसावा लागेल याची आपण काळजी घ्यायला हवी. या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील अशा काही टिप्स...

* थंडीत लहानग्यांना मऊ आणि ऊबदार कपडे घालावेत. बरेचदा थंडीत लहानग्यांची काळजी लोकरीचे कपडे घातले जातात. मात्र लोकर कडक, टोचरी, निकृष्ट दर्जाची अथवा अस्वच्छ असेल तर त्यांना त्वचाविकार संभवतात. म्हणूनच ऊबदार कपड्यांची वेळच्या वेळी स्वच्छता व्हावी. घराबाहेर पडताना डोकं, कान, नाक झाकेल अशी टोपी घालावी. बाहेर पडतानाचे कपडे लेअर्ड असावेत.
* थंडी असली तरी मुलांना आंघोळ घालायलाच हवी पणदुपारी उन्हं चढल्यावर आंघोळ घालणं अधिक चांगलं. आंघोळीसाठी अगदी गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर योग्य ठरतो. गरम पाणी मुलांच्या नाजूक त्वचेसाठी अयोग्य ठरतं त्याचबरोबर यामुळे त्वचा कोरडी पडण्याचा धोकाही वाढतो. महत्त्वाचं म्हणजे आंघोळीपूर्वी मुलांना मसाज करावा. बदामाच्या अथवा नारळाच्या तेलाने मसाज केल्यास त्यांना शरीरात आवश्यक ती उष्णता निर्माण होईल आणि अंघोळीचा त्रास होणार नाही. मात्र मसाज आणि आंघोळ याचा एकत्रित कालावधी पंधरा मिनिटांपेक्षा जास्त नसावा.
* आंघोळीनंतर मुलांना सौम्य नरिशिंग क्रीम लावावं. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकते त्याचबरोबर ती तेजस्वी
राहते.
* रात्री थंडीचा त्रास होऊ नये या दृष्टीने मुलांना भरपूर पांघरुण घातलं जातं. मात्र जाड ब्लंकेटमुळे गुदमरण्याचा धोका लक्षात घेता त्यांना ऊबदार कपडे घालणं आणि हलकं पांघरुण घालणं अधिक सुरक्षित समजलं जातं.
* रात्री झोपताना मुलांच्या खोलीच्या खिडक्या-दारं व्यवस्थित बंद करावीत. मात्र हिटरचा वापर करणार असाल तर खोलीचं तापमान अधिक वाढणार नाही याची खात्री करावी. हिटरचा ऑटो कट ऑफ योग्य पद्धतीने काम करत असल्याची खात्री करावी.
प्राजक्ता जोरी


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल ग्लो
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. यासाठी खर्च करुन ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या
सरकारी नोकरी 2021: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा बंपर भरती करण्यात येत आहे. या थेट भरतीमुळे ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती मिळेल
मासिक पाळीच्या काळात महिलांना ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, मूड बदलणे, सूज येणे, स्तन दुखणे ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या कोणत्या आजारांना धोका
जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ...