शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : बुधवार, 13 जानेवारी 2021 (23:07 IST)

या योगासनांच्या नियमित अभ्यासाने सर्दी पडसं होत नाही

बरेच लोक सर्दी पडसं साठी औषध घेणं पसंत करत नाही कारण त्या औषधां मुळे लोकांच्या पोटात उष्णता वाढते. लोकांना असं वाटत की सर्दी पडसं लवकर दूर व्हावं ते ही एखाद्या दुसऱ्या पर्यायाने .योग मध्ये प्रत्येक आजाराचे औषध आहे.सर्दी पडसं देखील योग मुळे दूर केले जाऊ शकतात. योगा मध्ये काही असे आसन आहे ज्यांना करून या समस्ये पासून आराम मिळू शकेल.

* हस्तपादासन-
सर्दी च्या त्रासांमध्ये हे खूप फायदेशीर आहे. या आसन ला करणे देखील खूप सोपे आहे. उभे राहून पुढे वाकल्यानं रक्तविसरण डोक्याकडे होतो. प्रयत्न करा की वाकताना गुडघे दुमडू नये. ही क्रिया सायनस स्वच्छ करते. हा प्राणायाम केल्यानं मज्जा संस्था बळकट होते.आणि शरीर तणाव मुक्त होतो. हे आसन रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढवतो. ज्यामुळे वारंवार सर्दीचा त्रास होत नाही.

* शवासन -
सर्दी पडसं च्या त्रासांमध्ये काही काळ योग्य प्रकारे केलेले शवासन देखील उपयुक्त सिद्ध होऊ शकतो. शवासन करायला खूप सोपे आहे. हे कोणीही करू शकतो. हे करण्यासाठी सर्वप्रथम झोपावं नंतर आपले संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करावं. नियमानं दीर्घ श्वास घ्या. काही काळ हेच करावं. आपल्याला सर्दीमध्ये फरक जाणवेल.

* नाडी शोधन प्राणायाम-
नाकाचे छिद्र बंद करून उघडावं आणि पाली-पाळीने श्वास घेतल्यानं सर्दीमुळे नाकाचे बंद झालेले छिद्र उघडून जातात. ज्यामुळे फुफ्फुसां पर्यंत ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचते आणि वारंवार नाकात त्रास होत नाही आणि सर्दीच्या त्रासातून सुटका होते. म्हणून वारंवार सर्दी पडसं होणं सामान्य बाब असल्यास आपल्याला ह्याची सवय लावून घ्यावी.

* मत्स्यासन -
मत्स्यासन चा नियमित सराव केल्यानं हळूहळू सर्दी पडसं बरं होते. हे करायला थोडा वेळ लागू शकतो पण ह्याचा सराव वारंवार केल्यानं हे करायला सहज होत तसेच हे केल्यानं ह्याचा परिणाम योग्य मिळतो.
असे बरेच लोक ज्यांच्या पाठीत वाक असतो त्यांनी देखील हे आसन करावे असं केल्यानं त्यांची पाठ आपल्या पूर्व स्थितीत येते.