बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शनिवार, 26 डिसेंबर 2020 (16:55 IST)

झोपण्यापूर्वी हे 6 योग करा तणावापासून मुक्ती मिळेल

दिवसभर थकल्यावर देखील शांत झोप येत नाही ? रात्री कूस बदलतात ? काळजी नसावी कारण आम्ही सांगत आहो काही असे योगांचे पोझ ज्यांना अवलंबवून रात्री चांगली झोपच येणार नाही तर आपण निरोगी देखील राहाल. योग एक अशी प्राचीन पद्धत आहे जी मेंदूच्या झोपेची क्रिया किंवा स्लीपिंग ऍक्टिव्हिटी आणि हार्मोन्स ला सक्रिय करते. या मुळे लवकर झोप येते आणि आपण स्वतःला सकाळी ताजेतवाने अनुभवता. चला तर मग जाणून घेऊ या की झोपण्याच्या पूर्वी कोणत्या योग पोझ केल्याने फायदा मिळेल.
 
कॅट/काऊ पोझ -
या योगा मुळे पाठ आणि मानेचा ताण कमी होतो आणि श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया सुधारते आणि चांगली झोप येते. या साठी कंबरेपासून वाकून गुडघे आणि हातांना जमिनीवर ठेवून टेबलटॉपच्या स्थितीत या. नंतर बेली ला सैल सोडून छातीला वर उचला.आता हळू-हळू श्वास आत घ्या. असं किमान 3 ते 5 वेळा करा.   
 
चाइल्ड पोझ - 
या साठी गुडघ्या आणि टाचांवर बसून गुडघे पसरवा. लक्षात ठेवा की आपले पाय फर्शीला स्पर्श केले पाहिजे. आता पाठीचा कणा सरळ करून पुढे वाका. आपले हात सरळ करून तळहाताचा फर्शीला स्पर्श करा. या स्थितीमध्ये श्वास घेऊन काही वेळ तसेच राहा आणि नंतर सामान्य स्थितीत या.
 
लो लंग पोझ, किंवा अंजान्यसन -
या पोझ मुळे पायाचे स्नायू उघडतात आणि या मुळे डायफ्रामॅटिक श्वास घेण्यात मदत होते. या साठी टेबलटॉप स्थितीत उजवा पाय हाताच्या मध्ये ठेवा आणि डाव्या गुडघ्याला मागे करा. नंतर हाताला फरशीवर ठेवून पुढील पाय गुडघ्यावर ठेवा. या स्थितीत 5 ते 10 वेळा श्वास घ्या आणि पायाला फिरवा.
 
बियर हग्स अँड स्नो एंजल्स पोझ -
हे दोन्ही व्यायाम छाती उघडतात आणि पाठीचा आणि खांद्याचा ताण कमी करतात. या मुळे रक्त परिसंचरण व्यवस्थित राहते. या पोझ साठी सरळ झोपा आणि गुघडे दुमडून पाय जवळ करा. आता दोन्ही हात छातीवर गळाभेट घेण्याच्या मुद्रेत ठेवा. आता हाताला उघडून जमिनीवर सरळ ठेवा. हे वारंवार करा. असं किमान 5 ते 6 वेळा करा.
 
बॉक्स ब्रिथ पोझ -
हे योग मनाला आणि शरीरास शांत ठेवण्यात मदत करते. हे आपण पलंगावर झोपून देखील करू शकता. यासाठी पाठीवर झोपून हातांना पोटावर ठेवा. 4 पर्यंत मोजून डोळे बंद करून नाकाने श्वास आत बाहेर घ्या. या प्रक्रियेला 3 ते 5 मिनिटा पर्यंत वारंवार करा.
 
सुपिन पिजन पोझ- 
हा योग कुल्हे उघडतो, पाठीच्या खालील भागात दबावापासून आराम देतो. या साठी गुडघ्यावर वाका आणि पायांना जमिनीवर टेकवा. आता गुडघ्यावर डाव्या मांडीवर उजवा पाय वळवून टेकवा. आता डाव्या मांडीला मागून धरा आणि दोन्ही पाय आपल्या कडे ओढा. दोन्ही पाय फ्लेक्स करा आणि डावा पाय गुडघ्याच्या उंची वर ठेवा जेवढे शक्य असेल. या स्थितीत 5 ते 7 वेळा श्वास आत बाहेर घ्या आणि सामान्य स्थितीत व्हा. आपण या योगाचे 2 -3 सेट करू शकता.