शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (21:26 IST)

भाजपा नेते कृष्णा हेगडे, मनसेचे मनीष धुरी यांनी ही 'याच' महिलेने ब्लॅकमेल केल्याचा केला खुलासा

सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेने आपल्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनी  केला आहे. सोबतच मनसे नेते मनीष धुरी यांनीही आपल्याला याच महिलेनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला आहे. 
 
हेडगे यांनी म्हटलं की, “संबंधित महिला माझ्याही मागे लागली होती. तिने मला संबंध ठेवण्याबाबत विचारलं त्यासाठी ती तीन-चार वर्षे माझ्या मागे होती. पण मी कायमच त्या महिलेला टाळलं. या महिलेनं मला वारंवार मेसेजही केले. इतकी वर्षे मी गप्प होतो पण आता धनंजय मुंडेंचं नाव आलं आणि मला वाटलं या आधी माझंही नाव येऊ शकलं असतं त्यामुळे मी पुढे आलो आणि संबंधित महिलेबाबत खुलासा केला. तसेच तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दिली आहे.
 
मनसे नेते मनीष धुरी यांनी “धनंजय मुंडें विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेनं माझा नंबर कुठूनतरी मिळवला आणि ती मला फॉलो करत होती. तिने माझ्याशी अनेकदा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्या लोकांना हेरायचा ती प्रयत्न करत असल्याचं मला कळालं होतं म्हणून मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. २०१८-१९ मध्ये ही महिला पैसे उकळण्यासाठी पुन्हा माझ्या संपर्कात आली. मी ही यात अडकलो असतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता. आत जर हेंगडेंनी या महिले विरोधात तक्रार दाखल केली आहे तर मी देखील तक्रार दाखल करणार आहे”