1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (16:19 IST)

राज्यात थंडी पुन्हा गायब, मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात पाऊसाची शक्यता

Cold disappears again
राज्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी पुन्हा गायब झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
 
अरबी समुद्राच्या दक्षिण- पश्चिम भागामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे राज्याच्या दिशेने बाष्पाचा पुरवठा होऊन थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी बहुतांश भागातून थंडी गायब झाली आहे. या बदलांमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. ११ आणि १२ डिसेंबरला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. १० डिसेंबरला कोकणात तुरळक ठिकाणी, तर १३ डिसेंबरला विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.