शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (08:45 IST)

राज्यात ४ हजार ९८१ नवे कोरोना रुग्ण दाखल

राज्यात बुधवारी ५ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ४२ हजार १९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४५ टक्के इतका झाला आहे. राज्यात ४ हजार ९८१ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका झाला आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १४ लाख ४७ हजार ७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ६४ हजार ३४८ नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४३ हजार ९१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. ५ हजार १०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या ७३ हजार १६६ रुग्ण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ४ हजार ९८१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ६४ हजार ३४८ इतकी झाली आहे.