मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (09:10 IST)

राज्यात ४९३० कोरोनाचे नवे रुग्ण दाखल

राज्यात मंगळवारी ४९३० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर ९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५८% एवढा आहे. तसेच आज ६२९० नवे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६९१४१२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९% एवढा झाला आहे. 
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १०९१५६८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८२८८२६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५३८०८४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ओरडते. मुंबईत १५०७८ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १५७७६ कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत. पुण्यात ऍक्टिव कोरोनाबाधितांचा आकडा हा २०२१५ इतका आहे.