मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 9 डिसेंबर 2020 (08:50 IST)

राज्यात ४ हजार २६ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

4 thousand 26 new corona patients
राज्यात मंगळवारी ६ हजार ३६५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत १७ लाख ३७ हजार ८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९३.४२ टक्के इतका झाला आहे. राज्यात ४ हजार २६ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ५३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.५७ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १३ लाख ७७ हजार ७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ५९ हजार ३६७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ५ लाखात ४८ हजार ९६१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ५ हजार ६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या  ७३ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ५९ हजार ३६७ इतकी झाली आहे अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुळे राज्यात ४७ हजार ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.