'या' सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी केली का ? प्रताप सरनाईक यांचा सवाल
मंगलप्रभात लोढा, पराग शहा, सुधाकर शेट्टींच्या संपत्तीची चौकशी केली का ? असा प्रश्न शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलाय. राजस्थानमधून आलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीची चौकशी केली का? भाजप आमदार पराग शहांची ५ हजार कोटींची संपत्ती, सुधाकर शेट्टीची शेकडो कोटींची संपत्ती, बंगालमधून आलेले अर्णब गोस्वामी एका चॅनेलचे मालक आहेत. हिमाचलमधून आलेल्या आणि मोठ्या संपत्तीची मालक असलेल्या कंगनाची चौकशी केली का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत, त्यांना तसं पत्राद्वारे उत्तरही पाठवलंय. ईडी ज्या ज्या वेळी चौकशीला बोलवेल, तेव्हा तेव्हा मी जाईन असे सरनाईकांनी म्हटलंय. मी रिक्षा चालवण्याबरोबर ऑम्लेट पावची गाडीही चालवली, याचा अभिमान आहे.पण गेल्या ३० वर्षात कायद्याचे पालन करून इथवर पोहचलो आहे. राहूल नंदा, अमित चंडेला यांच्याशी मैत्री आहे पण व्यावसायिक संबंध नाहीत असे सरनाईकांनी स्पष्ट केलं.
हे कॉर्पोरेट वॉर आहे. दोन्ही फिर्यादीत माझे नाव नाही. महाराष्ट्र, मराठी माणसाच्या विषयी आगपाखड करत असेल तर मी त्याला सोडणार नाही. हीच भूमिका कायम असून याकरता फासावर लटकवले तरी चालेल.सत्ता आहे म्हणून बायका मुलांना त्रास देत असाल तर ते योग्य नसल्याचे ते म्हणाले.