शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (13:15 IST)

'या' जिल्ह्यात पोलिसानी पकडला महिलांचा जुगार अड्डा

कोल्हापुरात पोलिसांनी एका ठिकाणी टाकलेल्या छाप्यात महिला जुगार खेळत असल्याचे आढळले आहे. या कारवाईत 7 महिलांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले असून या महिला सर्व रेकॉर्डवर गुन्हेगार असल्याचे समजले आहे. या कारवाईमध्ये 38 हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय.
 
मिळालेल्या माहितीनुसार,  इचलकंरजी व जयसिंगपूर परिसरामध्ये पोलिसांनी जुगार अड्यावर छापा टाकला होता. यावेळी 7 महिला जुगार खेळत असल्याचे आढळले. यामध्ये एका पुरुषालाही अटक केलीय. जयसिंगपूर भागामध्ये एका घरामध्ये तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी हि कारवाई केली. या कारवाईमध्ये सात महिलांना अटक केली आहे. या सातही महिलांवर खिशे कापणे, चोरीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.