सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 डिसेंबर 2020 (17:18 IST)

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास शक्य

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होईल, अशी मोठी घोषणा केली आहे. समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण होईल तेव्हा तो सर्वोत्तम महामार्ग असेल, निश्चितच महाराष्ट्राला याचा अभिमान वाटेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महामार्गाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. "आज पहिल्यांदाच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाचे काम अप्रतिम चालू आहे. प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असं आपण काम केलेलं असेल", असं उद्धव ठाकरे म्हणाले.