शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (08:30 IST)

चार राज्यातून येणाऱ्या हवाई प्रवाशांसाठी नियमावली जाहीर

कोरोनाचा हा वाढता फैलाव लक्षात घेऊन, राज्यातील स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने चार राज्यातून येणाऱ्या हवाई प्रवाशांसाठी नियमावली लागू केली आहे.
 
काय आहे नियमावली 
– दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट असला पाहिजे. म्हणजे त्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक आहे.
– महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी ही कोरोना चाचणी करावी लागेल.
– ज्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट नसेल, त्यांना विमानतळावर स्वखर्चाने कोरोना चाचणी करावी लागेल.
– चाचणीनंतर प्रवाशाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. फोन नंबर, पत्त्यासह सर्व माहिती त्या प्रवाशाकडून घेतली जाईल.
– ज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.