शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (16:37 IST)

अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद असल्यानं त्याचा मोठा फटका

कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद असल्यानं त्याचा मोठा फटका देवस्थान समितीच्या उत्पन्नाला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं कायम ठेवला आहे. त्यामुळं नवरात्रोत्सव काळातही राज्यातील मंदिरं बंदच होती.  भाविकांकडून सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह 5 ते 7 कोटी रुपयांचं दान देवीच्या चरणी अर्पण केलं जातं. 
 
मात्र, यावर्षी मंदिर बंद असल्यानं ऑनलाईन देणगीच्या माध्यमातून फक्त 1 कोटी 12 लाख रुपये देवस्थान समितीकडे जमा झाले आहेत. पूर्ण वर्षाच्या विचार केल्यास अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिराकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला २० कोटी रुपये प्राप्त होतात. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळं गेल्या 7 महिन्यांपासून मंदिरं बंद आहेत. त्यामुळं मंदिर समितीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.कोरोनामुळं मंदिरं बंद असली तरी देवस्थान समितीचा खर्च जैसे थेच आहे. त्यामुळं मंदिरं लवकर सुरु झाली नाहीत तर देवस्थान समित्यांची आर्थिक घडी विस्कटेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.