पबजीला उत्तर आता FAU-G गेम
सरकारने 2 सप्टेंबरला 118 चीनी अॅप्सवर बंदी घातली, यात लोकप्रिय गेम पबजीचा समावेश आहे. आता पबजीवर बॅन लागल्याच्या दोन दिवसानंतर अभिनेता अक्षय कुमारने पबजीला पर्याच म्हणून FAU-G गेम लॉन्च केला आहे. हा गेम खेळणाऱ्यांना देशातील जवानांच्या बलिदानाची माहितीदेखील दिली जाईल. हा अक्षय कुमारचा पहिला गेमिंग वेंचर आहे.
अक्षय कुमारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देताना म्हटले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या अभियानाला समर्थन देत FAU-G गेम आणताना आनंद होत आहे. या गेममध्ये प्लेअर्स मनोरंजना व्यतिरिक्त सैनिकांच्या बलिदानाविषयी माहिती मिळवू शकतील. या गेममधून जे उत्पन्न येईल त्यापैकी 20 टक्के रक्कम भारत के वीर ट्रस्टसाठी दान केले जाईल’, अशी घोषणा अक्षय कुमारने केली आहे.