सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (17:15 IST)

वडिलांच्या संपत्तीवर माझा हक्क, भैयूजी महाराज यांची मुलगी कुहू देशमुखचा दावा

भैयूजी महाराज यांची मुलगी कुहू देशमुखने वडिलांच्या संपत्तीवर माझा हक्क असून तो मिळवणासाठी मला न्यायालयाचे दरवाजे ठोठावायला लागले, तरी चालतील असे सांगितले. कुहूच्या वतीने ॲड. सुदत्त जयिसंग पाटील आणि ॲड. प्रियांका राणे-पाटील न्यायालयात बाजू मांडत आहेत. सध्या भैय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात इंदुर नायालयात सुनावणी सुरु आहे.
 
वडिलांच्या मृत्यूनंतर कुहू प्रसारमाध्यमांपासून दूर होती. शिनवारीमध्ये सुनावणीसाठी नायालयात हजर असलेला कुहूने प्रसारमाधमांशी आपल्या वडिलांशी निगडीत अनेक गोष्टींचा उलगडा केला. संपतीचा वाद, भैयूमहाराज यांची दुसरी पत्नी आयुषी, परिवारातील अन्य सदस्यांचे वागणे बोलण्यासह वडिलांचा मृत्यू संबंधित कुहू बोलली.
 
यावेळी तिचे वकील ॲड. प्रियांका राणे-पाटील मणाले, की कुहुला तिच्या विडलांच्या संपत्तीबाबत कोणतीही माहिती नाही. तिला हेही माहित नाही, की वडिलांचा मृत्यूनंतर  त्यांची संपत्ती कुठे कुठे आहे, त्यांची देखभाल कोण करीत आहेत. तिला बँक खाते आणि त्या खात्यांवरील व्यवहारांची माहिती नाही. कुहू पुण्यात बीबीएचे शिक्षण घेत आहे. तिची आजी तिचा शिक्षणाच्या खर्च उचलत आहे.