सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (16:38 IST)

महाविकास आघाडी सरकारवर प्रवीण दरेकर यांचे जोरदार टीकास्त्र

विधान परिषद पोटनिवडणुकीच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात विजयी झालेल्या अमरिश पटेल यांचं अभिनंदन करणारं ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं. याच ट्विटमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. “धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली ५० टक्केही मतं राखू शकलेली नाही. यावरून उद्याचे महाविकास आघाडीचे नक्की काय भविष्य असेल हे स्पष्ट होते”, असे टीका त्यांनी केली. तसेच, भाजपाचे उमेदवार अमरीश पटेल यांचे तसेच सर्व मतदारांचे त्यांनी अभिनंदन केले.
 
अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपात आलेले उमेदवार होते. तर अभिजीत पाटील भाजपामधून काँग्रेसमध्ये गेलेले उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीबाबत खूपच उत्सुकता होती. अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडण्यात यश मिळवले.