मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 डिसेंबर 2020 (08:43 IST)

कोयत्याने केक कापून वाढदिवस केला साजरा, पोलीसात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड येथे लोखंडी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या दोघांवर भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी एकाला अटक झाली आहे.
 
बर्थ-डे बॉय सोहेल शेख यांच्यासह मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल शेख यांचा वाढदिवस असल्याने त्याने आणि त्याचा मित्राने मिळून लोखंडी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. मात्र, यावेळी त्यांनी हत्यारांचे प्रदर्शन करून दापोडी परिसरामध्ये दहशत पसरवली, असा आरोप ठेवण्यात आला असून त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.