बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पूर्ण मराठवाड्याला आणि लातूरला पाणी नक्की मिळणार

हैद्राबाद मुक्तीदिनाचा वर्धापनदिन. निजामाच्या जुलमी राजवटीचा अंत होऊन मराठवाड्यासह हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले. या निमित्ताने लातुरच्या टाऊन हॉल मैदानावरील हुतात्मा स्मारक येथे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ध्वजारोहण केले. बंदुकीच्या तीन फैरींनी सलामी दिली. पालकमंत्र्यांसह मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. पालकमंत्री निलंगेकर यांनी या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक , वीरमाता, वीरपिता, वीर पत्नी यांची भेट घेऊन त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला. तसेच ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, विद्यार्थी, पालक व पत्रकार या सर्वांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. अपंगांना उपयोगी साहित्याचे वितरणही केले. महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर उपस्थित होते.
 
यावेळी पालकमंत्री निलंगकर यांच्या हस्ते गणेश विसर्जनाच्या कामात उत्कृष्ट काम करुन पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावून लातूरचा एक वेगळा पॅटर्न निर्माण करणाऱ्या जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त एम. डी. सिंह, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, पोलिस उप अधिक्षक सचिन सांगळे, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वंजारी यांनी केले.