1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (23:00 IST)

मोबाईलवर खेळण्यासाठी रागवल्यामुळे मुलाने वडिलांवर चाकूनं जीवघेणा हल्ला

The fatal attack on his son to play on mobile maharashtra regional news in marathi web dunia marathi
मोबाईलवर खेळण्यासाठी रागवल्यामुळे मुलाने वडिलांवर चाकूनं जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपुरमध्ये घडली .शुभम उर्फ गोलू निरगुडे( वय -25 वर्ष) असं आरोपी मुलाचे नाव आहे. दीपक भाऊराव निरगुडे असं दुर्दैवी वडिलांचे ( वय 52 वर्ष) नाव आहे. 
 
नागपुरातील इंदिरानगर जाटतरोडी क्रमांक 1मध्ये निरगुडे कुटुंब रहात. 55 वर्षीय दीपक निरगुडे रिक्षा चालवत तर त्यांच्या मुलगा 25 वर्षीय तरुण मुलगा शुभम बेरोजगार होता. शुभम घरी सतत मोबईलवर गेम खेळायचा, चित्रपट पहात राहायचा. वडिल दीपक मुलगा शुभमला सतत कामधंदा पहा मोबईलवर घरी का खेळत रहातो असं रागावयचे. यावरून त्यांच्यात खटके उडायचे. 25 जुनला रात्री दीपक निरगुडे रिक्षा चालवून घरी परतले त्यावेळी मुलगा त्यांना मोबईलवर खेळताना दिसला. त्यामुळं त्यांनी मुलालं मोबईल खेळत असल्याबद्दल रागवत कामधंदा शोधायला सांगितला. मात्र वडिलांनी रागवलं म्हणून शुभम संतापला. त्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि  घऱातील चाकू घेत वडिलांच्या पोटावर वार करत जीवघेणा हल्ला केला..यात वडिल गंभीर जखमी झाले..त्यांना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.